हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज मुंबईत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास सुरुवात झाली. अधिवेशनास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनुपस्थिती लावली. यावरून भाजप नेत्यांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला जात आहे. दरम्यान आज भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीवरून टीका केली. “उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की मुख्यमंत्र्यांची प्रकृती उत्तम ! मग रवींद्र वायकर यांच्या ED चौकशीमुळे मुख्यमंत्र्यांना हुडहुडी भरली आहे का? विधीमंडळात याच कारणामुळे ते गैरहजर आहेत का?, असा टोला भातखलकर यांनी मुख्यमंत्र्याना लगावला आहे.
भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करीत मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीवरून निशाणा साधला. त्यांनी ट्विट मध्ये म्हंटले आहे की, राज्याचे मुख्यमंत्री मुंबईत असताना त्यांना गरज वाटेल तेव्हा ते विधिमंडळात येतील. हे आदित्य ठाकरे यांचे म्हणणे म्हणजे महाराष्ट्राचा आणि विधिमंडळाचा अपमान आहे. आणि त्यांनी व मुख्यमंत्र्यानी महाराष्ट्राची व विधिमंडळाची माफी मागावी, अशी मी मागणी करीत आहे.
उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks म्हणतायत की मुख्यमंत्र्यांची प्रकृती उत्तम! मग रवींद्र वायकर यांच्या ED चौकाशीमुळे त्यांना हुडहुडी भरली आहे का? विधीमंडळात याच कारणामुळे ते गैरहजर आहेत का? pic.twitter.com/vYV2Zo9Aiq
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 22, 2021
अजित पवार म्हणत आहेत कि मुख्यमंत्र्यांची प्रकृती उत्तम आहे. मग काळ जी ईडीकडून रवींद्र वायकर यांची आठ तास चौकशी झाली. कदाचित त्यांच्या चौकशीमुळे तर मुख्यमंत्र्याना हुडहुडी भरली तर नाही ना. त्यामुळे ते आज गैरहजर आहेत का? हा खुलासा तरी करावा. विधिमंडळाच्या कामकाजाला राष्ट्रगीताने सुरुवात होते. त्यालाही मुख्यमंत्र्यानी उपस्थिती लावली नाही. हा राष्ट्रगीताचा अपमान आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे व आदित्य ठाकरे यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणीही यावेळी भातखळकर यांनी केली आहे.