हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप केला होता. तसेच अंडरवर्ल्डशी संबंधित लोकांकडून मलिक कुटुंबियांनी जमीन खरेदी केली असा आरोप फडणवीस यांनी केला. त्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी आणि राज्य सरकार वर टीका केली आहे.
चित्रा वाघ यांनी ट्विट करत म्हंटल की, १९९३ बॅाम्ब ब्लास्ट मधील आरोपींच्या मित्रांशी मुख्यमंत्री मांडीला मांडी लावून बसले आहेत…सत्तेसाठी अंडरवर्ल्डची मदत घेणारे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद होईल अशी टीका चित्रा वाघ यांनी केली.
१९९३ बॅाम्ब ब्लास्ट मधील आरोपींच्या मित्रांशी मुख्यमंत्री मांडीला मांडी लावून बसले आहेत…
सत्तेसाठी अंडरवर्ल्डची मदत घेणारे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद होईल..
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) November 9, 2021
बॅाम्ब ब्लास्ट मध्ये ज्या निष्पाप जीवांचे बळी गेले. त्यांच्या कुटुंबीयांशी..महाराष्ट्राच्या जनतेशी..मराठी माणसाशी..या सरकारं केलेला हा विश्वासघात आहे. देशवासियांच्या पाठीत #MVA कडून खंजीर खुपसला गेलाय. महाविकास आघाडी का हाथ अंडरवर्ल्ड के साथ असे ट्विट चित्रा वाघ यांनी केलं.
बॅाम्ब ब्लास्ट मध्ये ज्या निष्पाप जीवांचे बळी गेले
त्यांच्या कुटुंबीयांशी..
महाराष्ट्राच्या जनतेशी..
मराठी माणसाशी..या सरकारं केलेला हा विश्वासघात आहे.देशवासियांच्या पाठीत #MVA कडून खंजीर खुपसला गेलाय.
महाविकास आघाडी का हाथ
अंडरवर्ल्ड के साथ ! @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) November 9, 2021
काय आहे फडणवीसांचा आरोप
मुंबईतील १९९३ बॉम्बस्फोटातील आरोपींकडून मंत्री नवाब मलिकांनी कुर्ला येथे जमीन खरेदीचा व्यवहार केला होता असे फडणवीस यांनी म्हंटल. बॉम्बस्फोटातील आरोपींविरोधात टाडा लागला होता. टाडा लागलेल्या आरोपीची संपत्ती जप्त केली जाते. त्यामुळे ही मालमत्ता जप्त होऊ नये म्हणून मलिकांनी कमी किंमतीत ही जागा खरेदी केली का? असा सवाल फडणवीसांनी केला. १९९३ च्या बॉम्बस्फोटात अनेक निष्पापांचे बळी गेले. ज्या लोकांनी स्फोट घडवले. रेकी केली या लोकांसोबत जमीन व्यवहार करण्यामागे काय हेतू होता? असा सवाल त्यांनी केला.