हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पेगासस प्रकरणावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राऊत यांच्या घणाघाती हल्ल्याला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी टोला लगावला आहे. “संजयजी पेगासिसची चिंता सोडा ‘पेंग्वीनची’ चिंता करा”, असे वाघ यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हंटल आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी “पेगासस प्रकरणी चर्चा करण्यासाठी पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी संसदेत उपस्थित राहून केवळ तीन तास सरकारने या चर्चेसाठी द्यावेत. जर या सरकारकडे तीन तास देशासाठी आणि राष्ट्राच्या सुरक्षेसाठी नसेल तर या सरकारच्या हातात राष्ट्र सुरक्षित नाही, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्यावर आज केली. त्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राऊतांना टोला लगावला आहे.
संजयजी पेगासिसची चिंता सोडा
‘पेंग्वीनची’ चिंता करा
आज ज्या युवराजांच्या’प्रिय’ठेकेदारामुळं’डोरी’चा जीव गेला त्याच हायवे कंस्ट्रक्शन कंपनीला कोविड रूग्णासाठी ‘प्राणवायु’ पुरवठ्याचा ठेका दिला आहे….(१/२) @rautsanjay61 @mybmc @BJP4Maharashtra #BMC#SanjayRaut #BJPMaharashtra pic.twitter.com/zJ4AiyPcsQ— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) July 29, 2021
चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटल आहे कि, संजयजी पेगासिसची चिंता सोडा ‘पेंग्वीनची’ चिंता करा. आज ज्या युवराजांच्या’प्रिय’ठेकेदारामुळं’डोरी’चा जीव गेला त्याच हायवे कंस्ट्रक्शन कंपनीला कोविड रूग्णासाठी ‘प्राणवायु’ पुरवठ्याचा ठेका दिला आहे. हे लक्षात असावे, असे म्हणत वाघ यांनी आठवणही करून दिली आहे.