आता दिसेल तिथे थोबडवणार अन् नंतर… , चित्रा वाघ यांचा उर्फी जावेदला इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सध्या बॉलिवूड अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. सार्वजनिक ठिकाणी असे चाळे आम्ही चालू देणार नाही. टोकाची भूमिका घेऊ, शेवटपर्यंत लढा देऊ, पण उर्फीला धडा शिकवू. तिच्यावर कारवाई करण्यासाठी मी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे. तिच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. तरीदेखील जर हे प्रताप थांबले नाहीत तर तिला दिसेल तिथे थोबडवणार, असा इशाराच भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उर्फी जावेदला दिला आहे.

उर्फीचं चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर
“माझ्या नवीन वर्षाची सुरुवात आणखी एका पोलिसांच्या तक्रारीने झाली आहे. या राजकारण्यांना काही खरी कामं नाही आहेत का? या राजकारण्यांना, वकिलांना कळत नाही का? आपल्या संविधानात असा कोणताच नियम नाही ज्यानुसार ही लोकं मला जेलमध्ये पाठवू शकतील. माझे निप्पल व व्हजायना जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत मला तुम्ही तुरुंगात टाकू शकत नाही. तुम्हाला फक्त मीडियाचं लक्ष वेधून घ्यायचं आहे असे उर्फी जावेद म्हणाली. तसेच उर्फीने चित्रा वाघ (Chitra Wagh) यांना तुम्ही सेक्स ट्रॅफिकिंग विरुद्ध काम करा, अवैध डान्स बारवर बंदी आणा, अवैध देहविक्री व्यवसायावर बंदी आणा, या सर्व समस्या मुंबईत आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या”. असा सल्लासुद्धा दिला आहे.

या संदर्भात चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे लिखित पत्राच्या माध्यमातून विचित्र कपडे परिधान करत मुंबईतील रस्त्यांवर फिरणाऱ्या उर्फी जावेदबद्दल तक्रार दाखल केली आहे. ‘उर्फी जावेदरुपी स्त्री देहाचा बाजार रोखा’, अशी मागणी चित्रा वाघ यांनी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे केली आहे.

हे पण वाचा :
‘कांतारा’ फेम अभिनेता चेतन अहिंसावर ‘या’ प्रकरणी गुन्हा दाखल
अचानक कारच्या चाकाखाली आली बाईक, 10 फूट अंतरापर्यंत फरफटत गेला तरुण
KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांचा अपघात; पायाची नस कापली
IRCTC च्या वेबसाईटद्वारे अशा प्रकारे बुक करा तिकिटे
Indian Army मध्ये नोकरीची संधी; काय आहे पात्रता?