शिवसेनेचे अनेक लोक भेटतात, मनातला सांगतात; फडणवीसांच्या वक्तव्यामुळे खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारमधील अनेक गोष्टींची माहिती मिळत असल्याचा दावा भाजपकडून यापूर्वीही करण्यात आला आहे. दरम्यान आज भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्या ऑडिओ क्लिप व्हायरल प्रकरणावरून वक्तव्य केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. “कदमांची ऑडिओ क्लिप खरी की खोटी मला माहीत नाही. पण शिवसेनेत मोठी खदखद आहे हे निश्चित आहे. शेनेतील अनेक नेते आपल्याला भेटता. मनातल सांगतात,” असे फडणवीस यांनी म्हटलं आहे.

नांदेडमध्ये झालेल्या मोठ्या प्रमाणातील नुकसानीची पाहणी भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ” शिवसेना नेते रामदास कदम यांची व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप खरी की खोटी यावर मी काही कमेंट करणार नाही. शिवसेनेतील अनेक नेत्यांशी पदाधिकाऱ्यांनी अनेक वर्षांपासून संबंध आहेत. तिथले अनेक लोक मला भेटत असतात. त्यांच्या मनातलं काय ते सांगतात. त्यामुळे शिवसेनेत मोठी खदखद आहे, एवढं मात्र निश्चित.”

भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावे कि नाही हे त्यांनी ठरवावे. मात्र, ते जर आले तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. तर प्रशासनावरही दबाव राहील, असे फडणवीस म्हणाले.