केवळ मतांच्या लाचारीसाठी हिंदूत्वविरोधी पक्षांना शिवसेनेकडून साथ आहे; देवेंद्र फडणवीस यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारवर सध्या भाजपकडून निशाण साधला जात आहे. दरम्यान भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकावर पुन्हा निशाणा साधला आहे. मतांसाठी शिवसेनेला हिंदूत्वविरोधी पक्षांना साथ द्यावी लागत असल्याने त्यांचा आता खरा चेहरा उघड झाला आहे,” अशी टीकाही फडणवीस यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले कि, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला देशात भाजपविरोधात काँग्रेसला वगळूनच आघाडी करायची आहे. पण महाराष्ट्रात सरकारमध्ये काँग्रेस असल्याने त्यांची अडचण झाली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा मुंबई दौरा हा उद्योगपतींशी चर्चा करण्यापेक्षा भाजपविरोधी पक्षांची आघाडी उभारण्याच्या राजकीय कारणांसाठीच होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपविरोधी आघाडी उभारण्याचा देशभरातील विरोधी पक्षांनी २०१९ मध्ये प्रयत्न केला होता. पण तरीही केंद्रात भाजपचे सरकार आले. आताही तेच होईल व २०२४ मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेत येईल. शिवसेनेचे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे प्रेम बेगडी असून त्यांचे खासदारही बेतालपणे वक्तव्ये करीत आहेत व त्यांचा अपमान करीत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देऊ नका, पण किमान योग्य सन्मान ठेवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

राज्य सरकारने नॉम्सनुसार पंचनामे करून मदत द्यावी – फडणवीस

यावेळी फडणवीसांनी अवकाळी पावसामुळे शेतीचे झालेले नुकसान व त्याबाबत त्यांना राज्य सरकारने मदत करण्या संदर्भात मागणी केली. ते म्हणाले की, अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. फळबागा, पिकांच्या कापण्या झाल्या आहेत, अशा ठिकाणी नुकसान जास्त झाले आहे. अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान हे एनडीआरच्या नॉम्समध्ये बसते. त्यामुळे राज्य सरकारने नॉम्सनुसार पंचनामे करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना योग्य ती मदत दिली पाहिजे, असे फडणवीस यांनी म्हंटले.

You might also like