हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विदर्भासह मराठवाडा येथे मोठ्या नुकसान झाले आहे. या ठिकाणी भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांच्याकडून भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली जात आहे. दरम्यान, दौरा सुरु असतानाच त्यांनी अचानक दौरा रद्द केला आहे. तर दुसरीकडे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची तब्बेत ठीक नसल्याने दौऱ्याचे प्राथमिक कारण असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर कालपासून मराठवाडा दौऱ्यावर होते. दौरा सुरु असताना त्यांना पंकजा मुंडे यांच्या आजारी असण्याबाबत माहिती मिळाली. बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असल्याने त्यांनी अचानकपणे दौरा रद्द केला.
भाजपचे नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यांच्याकडून बीड जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी केली जात असताना त्यांच्या अशा प्रकारे अचानकपणे दौरा रद्द करणे व भाजप नेत्या पंकजा मुंडे या आजारी असल्याने हा निर्णय घेतला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.