हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार व अजित पवार यांच्यावर टीका केली होती. त्यावर आज अजित पवारांनी प्रत्युत्तर दिले. “पडळकरच्या टीकेला आणि उपटसूंभ लोकांना उत्तर द्यायला अजित पवार मोकळा नाही”, अशा शब्दात अजित पवार यांनी उत्तर दिले. यावर आता पडलकरांनी पलटवार केला आहे. “होय आहे मी उपटसूंभ, पवार कुटूंब उपटून टाकणार, पुरून उरलोय म्हणून पवार कुटुंबीय माझ्यावर बावचळलं आहे. बारामतीत जाऊन त्यांना उत्तर देणार, अजित पवार किस झाड कि पत्ती, असा इशारा देत घणाघाती टीका पडळकरांनी केली आहे.
गोपीचंद पडळकर यांनी आज पुन्हा माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या प्रतिक्रियेला प्रत्युत्तर दिले. पडळकर म्हणाले की, निवडणुकीत इंदिरा गांधी यांचाही पराभव झाला आहे. तर मग अजित पवार किस झाड कि पत्ती आहे. अजित पवारांना बरोबरी ठरवण्याचा अधिकार कुणी दिलेला नाही.
जनतेनी त्यांना जास्तीची मते दिली म्हणून त्या मस्तीमध्ये आणि त्या माजामध्ये जाउ नये. या जनतेने अनेक लोकांना घरी बसवलेलं आहे. इंदिरा गांधी यांच्यासारख्यांचा पराभव झालेला आहे. त्यामुळे अजित पवार हे किस झाड कि पत्ती आहे. त्यांना सुद्धा काही काळामध्ये त्यांचं उत्तर मिळेल, असा इशारा पडळकर यांनी दिला आहे.