हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस नेते नवाब मलिक यांना मनी लॉंड्री प्रकरणी अटक करण्यात आली आहे. नुकतेच त्यांच्यावर 5 हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले असून सर्वोच्च न्यायालयानेही त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. विशेष म्हणजे मलिक अजूनही मंत्रिपदावरच आहेत. त्यांच्या या प्रकरणावरुन भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. मलिक यांना मंत्रिमंडळात ठेवण्यात आले आहे. त्यांना मंत्रिमंडळात ठेऊन मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे, असे म्हणत उपाध्ये यांनी टीका केली आहे.
भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची पत्रकार परिषद. https://t.co/Xir04FLnkS
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) April 22, 2022
केशव उपाध्ये यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, नवाब मलिक यांच्यावर बेनामी मालमत्तांच्या व्यवहारातून गोळा केलेला पैसा दाऊदच्या दहशतवादी कारवायांना पुरविण्याचा आरोप करण्यात आलेला आहे. आपल्यावर आरोप होऊनही त्यांनी एक विक्रम केला आहे तो म्हणजे ते तुरुंगात राहून सर्वाधिक काळ बिनखात्याचे मंत्री म्हणून नवा विक्रम केला आहे.
वास्तविक पाहता मलिक यांना जेव्हा अटक झाली तेव्हा त्यांची मंत्रिमंडळातून हक्कलपट्टी करायला हवी होती. प्रत्येकवेळी महाराष्ट्राची अस्मिता जपण्याची भाषा मुख्यमंत्री करत आहेत. त्यांच्याकडून आता मात्र मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध ठेवणाऱ्या मलिक याची पाठराखण केली जात आहे.