ठाकरे – पवार सरकारकडून महाराष्ट्रात वसुली सरकार निर्माण करण्याचे पाप – किरीट सोमय्या यांची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्याकडून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात आहे. सोमय्या यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला. “सध्या ठाकरे सरकारमधील तीन मंत्र्यांकडून आपल्या जावयांना खुश करण्याचे काम केले जात आहे. राज्यात सध्या सर्वत्र भ्रष्टाचार, घोटाळे केले जात आहे. मी महाराष्ट्राला घोटाळेमुक्त करणार आहे. घोटाळेबाज ठाकरे पवार सरकारकडून महाराष्ट्रात वसुली सरकार निर्माण करण्याचे पाप केले जात आहे,” अशी टीका सोमय्या यांनी केली.

किरीट सोमय्या यांनी एका कार्यक्रमात ठाकरे सरकार हल्लाबोल केला. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्रात ज्या मंत्र्यानी घोटाळे केलेले आहे. त्या मंत्र्याचे घोटाळे आम्ही बाहेर काढणार आहे. त्यांच्या घोटाळ्याचे फटाके दिवाळीनंतर फोडणार आहे. महाराष्ट्रात घोटाळेच घोटाळे निर्माण करण्याचे पाप केले जात आहे. दिवाळीनंतर महाराष्ट्र घोटाळेमुक्त करणार आहे. महाविकास आघाडी सरकारमधील काही नेत्या, मंत्र्यांकडून आपल्या जावयांना खूश करण्याचे काम
केले जात आहे. नवाब मलिक रोज उठून जातीवरून आरोप करतात.

“तेरा दिवस पाहतोय महाविकास आघाडीतील ठाकरे पवार यांच्याकडून व राष्ट्रवादी काँग्रेस नेते नवाब मलिक यांच्याकडून आरोप केले जात आहेत. तेरा दिवस आरोप करीत टीका करण्याचे तुम्ही नाटक केले आहे. मात्र, तुमच्या या तेरा दिवसांतील काम आता जनता करणार आहे,” असा इशारा सोमय्या यांनी दिला आहे.

Leave a Comment