हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेतेतथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांशी संबंधित जरंडेश्वर कारखान्याप्रकरणी आरोप केले होते. त्यानंतर आयकर विभागाच्यावतीने पवारांच्या काही कारखान्यावर छापेही टाकण्यात आले. त्यानंतर आज सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. “उद्या आपण बारामतीला जाणार असून अजित पवारांची सही केलेला तो कागद दाखवणार असल्याचे सोमय्या यांनी म्हंटले आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी आज संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, उद्या मी बारामतीला जाणार आहे. आतापर्यंत १५० कंपन्यांची माहिती समोर आली आहे. माझ्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहीचे कागद आहेत. ते मी उद्या बारामतीला गेल्यावर सर्वाना दाखवणार आहे. त्यावेळी कळेल कि अजित पवार यांनी काय काय केले आहे.
यावेळी सोमय्या यांनी नवाब मलिक यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते यांना एनसीबीची माहिती मिळते. एकीकडे कळत नाही कि मलिक हे नक्की कोकणाचे प्रवक्ते आहेत. ते राष्टवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत कि ड्रग्ज माफियांचे, असा टोला सोमय्या यांनी यावेळी लगावला आहे.