हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “भास्कर जाधव आता बडबड करत आहेत. मात्र त्यावेळी टिकीट काढून गुवाहाटीतील हॉटेलसमोर मला शिंदे गटात घ्या, तोपर्यंत मी वापस जाणार नाही, असे म्हणत होते. सुनील राऊत देखील भास्कर जाधव यांच्यासोबत होते. भास्कर जाधव यांनी शिंदे गटात येण्यासाठी एकनाथ शिंदे यांना 100 वेळा फोन केला होता, असा गौप्यस्फोट भाजप नेते मोहित कंबोज यांनी केला आहे.
मोहित कंबोज यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ ट्विट केला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हंटले आहे की, ज्यावेळी एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेले त्यावेळी 2022 मध्ये भास्कर जाधवांनीच त्यांना फोन केला होता. “खिस्यानी बिल्ली खम्बा नोचे,” ही म्हण भास्कर जाधवांना लागू होते. जून महिन्यात भास्कर जाधवांनी शिंदे गटात येण्यासाठी आग्रह धरला त्यावेळी अनेक आमदारांनी जाधवांना शिंदे गटात घेण्यास विरोध केला. कारण भास्कर जाधव यांच्यावर विश्वास ठेऊ शकत नाही, असे आमदारांचे म्हणणे होते.
खिस्यानी बिल्ली खम्बा नोचे !@_BhaskarJadhav की सचाई ! pic.twitter.com/rraB413XC2
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) February 27, 2023
त्याचसोबत आज भास्कर जाधव जितके बोलतायेत. तितके तेव्हा तिकीट काढून गुवाहाटीच्या हॉटेलबाहेर बसण्याची आणि जोपर्यंत मला गटात घेत नाही तोवर परतणार नाही अशा बाता करत होते. भास्कर जाधव यांनी त्यावेळी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंबद्दल काय काय बोलले, कसा त्यांना वेळ दिला नाही हे ते सांगत होते. हे सर्व भास्कर जाधव नाकारू शकतात का? असा सवाल कंबोज यांनी उपस्थित केला आहे.