महाराष्ट्रातील जनतेने तुम्हालाच अंडी उबवण्यासाठी ठेवलेय; निलेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बारामती येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप व केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यावर घणाघाती टीका केली होत. त्यावरून आता भाजप नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री ठाकरेंनी आमच्यावर टीका करण्याअगोदर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ट्रेनिंग घ्यावी. कारण ते काय बोलतात तेच कळत नाही. 2024 मध्ये महाराष्ट्रातील जनतेने तुम्हाला अंडी उबवण्यासाठी ठेवले आहे, असा टोला राणेंनी लगावला आहे.

भाजप नेते निलेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, शिवसेना आणि भाजपच्या युतीवेळी उद्धव ठाकरे काय करत होते? तर ते 1995 पर्यंत हातात कॅमेरा घेऊन जंगलात फिरत होते. भाजपशी उद्धव ठाकरे यांचा काय संबंध? तुटले काय किंवा जुळले काय? याचा काहीही फरक हा उद्धव ठाकरे यांना पडत नाही.

ज्या स्वर्गीय बाळासाहेबांनी 25 वर्षे सेना-भाजप युती जपण्याचे काम केले. त्यांच्ये सुपुत्र असलेले उद्धव ठाकरे यांना मात्र जमलेले नाही. आतापर्यंत शिवसेनेचे भाजपवर आणि भाजपचे सेनेवर प्रेम होते. दोन्ही पक्षांच्या प्रेमात उद्धव ठाकरे मात्र, कुठेच नव्हते. त्यामुळे त्यांना युतीवर भाष्य करण्याचा अधिकार काय? असा सवाल निलेश राणेंनी केला आहे.