राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांपेक्षा खासदार सुळेंना…; निलेश राणेंचा ट्विटद्वारे टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते निलेश राणे यांच्याकडून महाविकास आघड़ूई सरकारवर वारंवार निशाणा साधला जातो. आज राणेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे. राणेंनी खासदार सुळे यांचा एका सभेतील व्हिडीओ ट्विट केला असून त्यातून सुळेंना तिला लगावला आहे. त्याचबरोबर राणेंनी “राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांपेक्षा खासदार सुळेंना इतरांवर व निसर्गावर जास्त विश्वास दिसतो,” असे म्हणत टोला लगावला आहे.

भाजप नेते निलेश राणे यांनी आज केलेल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “ज्या सभेच्या वेळेला पाऊस पडला आणि लोकांनी आदर ठेवण्यासाठी मतदान केलं पण खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं की पवारांना लोकांच्या भावनेशी काही घेणे देणे नाही फक्त निवडणूक महत्त्वाची. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांपेक्षा खासदार सुळेंना इतरांवर व निसर्गावर जास्त विश्वास दिसतो.,” असे म्हंटले आहे.

निलेश राणे यांनी यापूर्वीही अनेकवेळा राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार, आमदार तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. दरम्यान त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा एका सभेतील व्हिडीओ शेअर करीत शरद पवार यांना लोकांच्या भावनेपेक्षा निवडणूक किती महत्वाची आहे, हे दाखवून दिले आहे.