आपल्या साहेबांची जयंती ही लोकांच्या सेवेसाठी आहे; पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावरून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गोपीनाथ गड गावा-गावात पोहोचवण्याचा संकल्प केला. दरम्यान यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या वाढदिवसावरून धनंजय मुंडे यांना देखील टोला लगावला. परळीमध्ये शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेले आहेत. मात्र, आपली जयंती ही लोकांच्या सेवेसाठी आहे, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे.

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावरून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसावरून राष्ट्रवादी काँग्रेस नेते धनंजय मुंडे यांना टोला लगावला. यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, गोपीनाथ गड गावा-गावात पोहोचला पाहिजे. त्यासाठी आज संकल्प करीत आहोत. गोपीनाथ मुंडे यांची जयंती सेवेसाठी समर्पीत आहे, असे मुंडे यांनी म्हंटले.

यावेळी पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, मला एका कार्यकर्त्यांनी सांगितले की, परळीमध्ये पवारांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य असे पोस्टर लावण्यात आले आहेत. तर मी त्याला म्हणाले की असूदेत आपली जयंती ही लोकांच्या सेवेसाठी आहे, असा टोला पंकजा मुंडे यांनी लगावला.