व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या; हल्लेखोर फरार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पश्चिम बंगाल येथील पूर्व बर्धमान जिल्ह्यात भाजप नेते राजू झा यांची हत्या करण्यात आली आहे. शनिवारी रात्री तब्बल 5 गोळ्या झाडून त्यांचा निर्घृण खून करण्यात आलाय. आसनसोल- दुर्गापूर भागात ही घटना घडली असून या घटनेत राजू झा यांचे साथीदार गंभीर जखमी झाले. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत .

माहितीनुसार, राजू झा यांचे दुर्गापूरमध्ये हॉटेल्सशिवाय अनेक व्यवसाय आहेत. शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ते दोन साथीदारांसह आपल्या फॉर्च्युनर गाडीने कोलकात्याकडे निघाले होते. त्याच दरम्यान शक्तीगडमध्ये आदि लेंगला पॅलेसच्या दुकानासमोर त्यांची गाडी थांबली त्याचवेळी पाठीमागून एक निळ्या रंगाची कार तेथे पोहोचली आणि त्यातील दोन तरुणांनी गाडीतून खाली उतरून राजू यांना गोळ्या झाडल्या. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच त्यांचे साथीदार गंभीर जखमी झाले.

दरम्यान, या हल्ल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. या प्रकरणात पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र या गोळीबार प्रकरणाने संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये खळबळ उडाली आहे.