हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या चौदा दिवसांपासून केल्या जात असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत तोडगा काढण्यासाठी परिवहनमंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत महत्वपूर्ण घोषणा केल्या. यानंतर शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी परिवहनमंत्री परब यांनी केलेल्या घोषणेबाबत व संपाबाबत कर्मचाऱ्यांशी चर्चा करणार आहे. तसेच याबाबत उद्या सकाळी अकरा वाजता पत्रकार परिषद घेत भूमिका जाहीर करणार असल्याचे सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.
आझाद मैदानावर दाखल झाल्यानंतर शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत व भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी खोत म्हणाले की, आज जो परिवहनमंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबाबत निर्णय घेतला. त्यांनी जी काही पगारवाढीबाबत प्रस्ताव मांडला आहे. जो निर्णय घेतला आहे. त्याबाबत कर्मचाऱ्यांशी चर्चा करणार आहे. विलीनीकरण व सातवा वेतन आयोग या निर्णयावर चर्चा केली. त्यावेळी सरकारने सांगितले कि पगारवाढ करणार आहे.
गोपीचंद पडळकर म्हणाले की, एसटीच्या विलीनीकरणाच्या मुद्यांवर परिवहनमंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी पगारवाढी संदर्भात भूमिका जाहीर केली आहे. आता सर्व आंदोलक कर्मचाऱ्यांशी आज रात्री बोलणार आहोत. हा कर्मचाऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. त्यामुळे उद्या सकाळी अकरा वाजता पत्रकार परिषद घेत भूमिका जाहीर करणार असल्याचे पडळकर यांनी सांगितले.