“कॅबिनेट बैठकीला आता दोन स्क्रीन असणार का?” ; भाजप नेत्यांचा सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीच्यावतीने कारवाई करण्यात आली. आज महाविकास आघाडी सरकारच्यावतीने निषेध करत धरणे आंदोलन केले जात आहे. दरम्यान, आता भाजपाचे केशव उपाध्याय यांनी ट्विट करत राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. “कॅबिनेट बैठकीला आता दोन स्क्रीन असणार का? एक मातोश्रीवरून कारण मुख्यमंत्री कायमच ऑनलाईन असतात. आता काय दुसरी स्क्रीन थेट मलिक यांच्या कोठडीतून लावणार का?,” असा सवाल उपाध्याय यांनी केला आहे.

भाजपचे नेते केशव उपाध्ये यांनी आज ट्विट करीत राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले की, “अटकेत असलेले नबाब मलिक यांना राजीनामा द्यायची गरज नाही असा सूर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी लावला मग कॅबिनेट बैठकीला आता दोन स्क्रीन असणार का? एक मातोश्रीवरून कारण मुख्यमंत्री कायमच online असतात. आता काय दुसरी स्क्रीन थेट मलिक यांच्या कोठडीतून लावणार का?, असा सवाल उपाध्ये यांनी केला आहे.

दरम्यान, भाजपच्यावतीने पत्रकार परिषदही घेण्यात आली. यावेळी उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. यावेळी ते म्हणाले की, एकेकाळी बाळासाहेब ठाकरे यांचा ठाकरी बाणा सर्वपरिचित होता. मात्र, उद्धव ठाकरे सांगतात मी बाळासाहेबांचा मुलगा आहार. मात्र, सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने मलिक यांचा राजीनामा न घेण्याची भूमिका जाहीरपणे सांगून टाकली.

मंत्रिमंडळात कोणाला ठेवायचे कोणाला नाही असा अधिकार हा मुख्यमंत्री पदावर बसलेला व्यक्तीला असतो. मात्र, मुख्यमंत्री ठाकरेंकडून काहीच कारवाई करण्यात आलेली नाही. मुख्यमंत्र्यानी नवाब मलिक यांना अटक केल्याने त्यांच्या मंत्रिपदाबाबत कारवाई करून आपला ठाकरी बाणा दाखवावा, अशी मागणी उपाध्ये यांनी केली.

Leave a Comment