हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा आरक्षणाच्या प्रश्नी रणनीती आखण्यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून तयारी केली जात आहे. या समाजाच्या आरक्षणासाठी मराठा समाज उपसमितीची स्थापना आघाडी सरकारकडून करण्यात आली आहे. या उपसमितीची बैठक आज पार पडली. या बैठकीनंतर काँग्रेसनेते अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी चव्हाण यांनी भाजपने केलेल्या आरोपांवर पलटवार केला. “भाजपची आजची झालेली बैठक हि मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी नसून ती करण्यासंदर्भात घेण्यात आली आहे, असे चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
अशोक चव्हाण म्हणाले, “मला वाटलं कि भाजपच्या नेत्यांनी आज जी काही बैठक घेतली ती मराठा मजला आरक्षण मिळवून देण्यासाठी घेतली असावी. मात्र तसे दिसत नसून मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत आंदोलन करण्यासाठी हि बैठक घेण्यात आली आहे. आरक्षणासाठी जर भाजपची भूमिका असेल तर त्याचे आम्ही स्वागतच करू. मात्र त्यांची आरक्षणाविरोधात भूमिका दिसत आहे. भाजपला खरच मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचं असेल तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी अथवा राष्ट्रपती यांची भेट घ्यावी. आणि आरक्षण मिळवू देण्यासाठी प्रयत्न करावे.”
“मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी या समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारतर्फे निवृत्त न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती स्थापन करण्यात आलेली आहे. या उपसमितीची जी आज बैठक घेण्यात आली. त्यामध्ये अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. मराठा आरक्षणाबाबत निवृत्त न्यायाधीश दिलीप भोसले हे ३१ रोजी अहवाल देणार आहेत. त्यांच्या सल्ल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल,” असे चव्हाण यांनी सांगितले.