लपवाछपवी करणाऱ्या नवाब मलिकांची नार्को टेस्ट करा; आशिष शेलार यांची टीका

0
36
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यावर मलिक यांनी प्रत्युत्तर दिले. मलिकांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजप आमदार आशिष शेलार यांनी निशाणा साधला. “मंत्री नवाब मलिक यांनी आज जी माहिती दिली आहे. ती आठ महिने का लपवली? हा प्रश्न उपस्थित होतो. मलिक यांची सवय लपवाछपवीची आहे. त्यामुळे मलिक व त्यांच्याशी संबंधित असलेल्यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी आम्ही करत आहोत, असे भाजप आमदार आशिष शेलार यांनी म्हंटले आहे.

भाजप नेते तथा आमदार आशिष शेलार यांनी ट्विट करीत महाविकास आघाडी सरकार व मंत्री नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, “गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधील एका मंत्र्यांचे फुसके बार मागील काही दिवसांपासून आपण महाराष्ट्रात आणि देशभरात ऐकत आहोत. आज मालिकांच्या आरोपाचे एवढेच वर्णन करेन की, दिवाळीनंतर जो बॉम्ब देवेंद्र फडणवीस फोडणार आहेत. तो बॉम्ब फुटण्या अगोदरच त्या बॉम्बच्या आवाजायला घाबरून त्यांनी कानावर हात कसे ठेवले. त्याचे चित्र आज मालिकांच्या बदललेल्या चेहऱ्यावरून स्पष्ट झाले आहे. तरीही दिवाळीनंतर बॉम्ब हा फुटेलच.

सत्याला कशाचीही दर असण्याचे कारण नाही. समीर वानखेडे यांना चरियाचे प्रमाणपत्र देणे हे काही भाजपचे काम नाही. एनसीबीने ड्रग्जच्या विरोधात बिनतोड कारवाई हि केलीच पाहिजे. यात कोणाचाही मुलाहिजा ठेवण्याची आवश्यकता नाही, हीच भाजपची मागणी आहे. मुद्दामहून आमच्या विरोधकांकडून विषय कुठेतरी भरकवटण्याचा प्रकार केला जात आहे.

मंत्री नवाब मलिक यांनी आज जी माहिती दिली आहे. ती आठ महिने का लपवली? हा प्रश्न उपस्थित होतो. मलिक यांची सवय लपवाछपवीची आहे. त्यामुळे मलिक व त्यांच्याशी संबंधित असलेल्यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी आम्ही करत आहोत, असे भाजप आमदार आशिष शेलार यांनी म्हंटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here