ठाकरे सरकारला जागे करण्यासाठी “उटणे” लावायचे का?; आशिष शेलारांची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या आर्यन खान ड्रग्ज प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आज मलिक यांनी थेट विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीवर टीका केल्यानंतर यावरून भाजप आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकार व राष्ट्रवादीवर टीका केली आहे. “ठाकरे सरकारने झोपेचे सोंग घेतले आहे का? सरकारला जागे करण्यासाठी “उटणे” लावायचे का?एक मंत्री आपल्या बौध्दिक दिवाळखोरीचे रोज दर्शन घडवतोय हा ठाकरे सरकारचा किमान समान कार्यक्रम आहे का? असा सवाल शेलार यांनी केला आहे.

भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विट करीत ठाकरे सरकावर टीका केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “आरोग्य विभागाची परिक्षा जाहीर होताच वारंवार पेपर फुटतो आणि सरकारच्या अब्रूचे धिंडवडे निघतात. सुमारे 31 एसटी कर्मचारी आत्महत्या करतात पैकी एका कर्मचाऱ्यांने तर एसटीलाच लटकून गळफास घेतला आणि ठाकरे सरकारची अब्रू वेशीवर टांगली.

ठाकरे सरकारने झोपेचे सोंग घेतले आहे का? सरकारला जागे करण्यासाठी “उटणे” लावायचे का? एक मंत्री आपल्या बौध्दिक दिवाळखोरीचे रोज दर्शन घडवतोय…हा ठाकरे सरकारचा किमान समान कार्यक्रम आहे का? कडेलोट झालाय..बंद करा हे, नाही तर जनता तुम्हाला “चिरुटे” सारखी चिरडेल, असे भाजप नेते आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.