हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महापौर किशोरी पेडणेकर आणि भाजप आमदार आशिष शेलार यांच्यातील वाद आता पोलिस स्टेशनपर्यंत पोहोचला आहे. पेडणेकर यांनी आशिष शेलार यांच्याविरोधात मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यावर आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली असून पोलीस दलाचा दुरुपयोग, सत्तेचा दुरुपयोग सुरु आहे. मी कोणत्याही महिलेचा, महापौरांचा अपमान केलेला नसताना दोन पोलीस स्टेशनला फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. भाजप या गोष्टींना दबणार नाही. ठाकरे सरकारच्या अशा अहंकारासमोरआशिष शेलार झुकणार नाही, अशा शब्दात शेलार यांनी प्रत्युत्तर दिले.
आशिष शेलार यांनी आज ट्विट करीत माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, नायर रुग्णालयात चार महिन्याच्या बाळाला उपचार का मिळाला नाही. त्या बाळाच्या वडिलांचा मृत्यू, आईचा मृत्यू का झाला? हे प्रश्न विचारत आहे. सत्य बाहेर येईलच, जी चौकशी करायची आहे ती करा सत्य बाहेर येईल, असं आशिष शेलार म्हणाले. यावर जी पावलं उचलली पाहिजेत ती मी उचलणार आहे.
खोट्या तक्रारी, गुन्हे दाखल करुन आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न जरी केलात, तरी ठाकरे सरकारच्या अशा अहंकारासमोर झुकणार नाही, दबणार नाही.. जनतेच्या प्रश्नांचा संघर्ष अधिक जोमाने करु! @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil pic.twitter.com/lM94h8RZcs
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 8, 2021
महिलांचा अपमान करणे हा माझा स्वभाव नाही, तसे आमचे संस्कारही नाही. मा. महापौर किशोरीताई पेडणेकर यांचा आणि माझा गेले अनेकवर्षांचा स्नेह असून नगरसेवक म्हणून एकत्र काम केले आहे. महापालिका सभागृहात मुंबईकरांच्या विषयावर अनेक वेळा कडवा संघर्षही झाला, पण कटूता, अपमान असे कधी घडले नाही. अहंकाराने ग्रासलेल्या ठाकरे सरकार विरोधात कोणीही बोलले, भ्रष्टाचार उघड करु लागले की मग सत्तेचा, पोलीसांचा गैरवापर कसा केला जातो, हे गेली दोन वर्षे जनता पाहतेय. मी जे बोललोच नाही आणि जे बोललो त्याचा विपर्यास करुन जो बागुलबुवा उभा केलाय, त्या विरोधात माझी बाजू न्यायालयात मांडेन.
अहंकाराने ग्रासलेल्या ठाकरे सरकार विरोधात कोणीही बोलले, भ्रष्टाचार उघड करु लागले की मग सत्तेचा, पोलीसांचा गैरवापर कसा केला जातो, हे गेली दोन वर्षे जनता पाहतेय. मी जे बोललोच नाही आणि जे बोललो त्याचा विपर्यास करुन जो बागुलबुवा उभा केलाय, त्या विरोधात माझी बाजू न्यायालयात मांडेन.
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 9, 2021
ठाकरे सरकार अहंकाराने ग्रासलेले – शेलार
माझ्या 25 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत आंदोलन सोडून हा पहिला गुन्हा दाखल झाला आहे. अहंकाराने ग्रासलेल्या ठाकरे सरकार विरोधात कोणीही बोलले, भ्रष्टाचार उघड करु लागले की मग सत्तेचा, पोलीसांचा गैरवापर कसा केला जातो, हे गेली दोन वर्षे जनता पाहतेय. मी जे बोललोच नाही आणि जे बोललो त्याचा विपर्यास करुन जो बागुलबुवा उभा केलाय, त्या विरोधात माझी बाजू न्यायालयात मांडेन.