हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार आणि सामना दैनिकाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Shiv Sena Sanjay Raut) यावर देशद्रोहचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विधान परिषदेचे भाजपचे आमदार अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी केंद्र सरकारकडे केली. संजय राऊत कार्यकारी संपादक असलेल्या दैनिक सामना मध्ये राऊत यांनी लेख लिहून फुटीरतावाद्यांना प्रोत्साहन दिले असल्याचा आरोप भातखळकर यांनी केला आहे. आमदार भातखळकर यांनी संजय राऊतांनी ‘बोरूबहाद्दर’ असंही संबोधलं आहे.
रोखठोक सदरात राऊत यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत, अशी जळजळीत टीका भातखळकर यांनी केली आहे. देशात विभाजनवादी प्रवृत्ती वाढत असून रशियाप्रमाणे आता भारतातूनही राज्ये फुटून निघतील, अशा स्वरुपाचे देशद्रोही वक्तव्य राऊत यांनी लेखात केल्याचे भातखळकर यांनी दाखवून दिले आहे. अशा स्थितीत देशातल्या फुटीरतावादी प्रवृत्तीला प्रोत्साहन देणारी विधाने केल्याबद्दल राऊत यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशीही मागणी भातखळकर यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
संजय राऊतांवर देशद्रोहाचा खटला दाखल करा… pic.twitter.com/Pnhtd6VrG5
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 27, 2020
नक्की काय म्हणाले संजय राऊत?
सन 2020 वर्ष मावळत आहे. मावळते वर्ष काहीच चांगले पेरून गेले नाही. त्यामुळे नवीन वर्षात कोणती फळे मिळतील त्याचा भरवसा नाही. लोकांनी एकच करावे, आपले कुटुंब कसे वाचवता येईल ते पाहावे. बाकी देश सांभाळायला मोदी व त्यांचे दोन-चार लोक आहेत’ असा सणसणीत टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी रोखठोक लगावला.
हिंदुस्थान-चीनमधील तणावातून निर्माण झालेले हे संकट आहे. चीनचे सैन्य 2020 मध्ये हिंदुस्थानच्या हद्दीत घुसले. त्यांनी आपली जमीन ताब्यात घेतली. ‘चिनी सैनिकांना आपल्याला मागे ढकलता आले नाही, पण लोकांचे लक्ष या संकटावरून हटवण्यासाठी राष्ट्रवादाची नवी काडी टाकली गेली. चिनी माल व चिनी गुंतवणुकीवर बहिष्कार टाकण्याचा प्रचार झाला. चिनी गुंतवणूक रोखण्यापेक्षा चीनचे सैन्य मागे ढकलले असते तर राष्ट्रवाद प्रखर तेजाने उजळून निघाला असता’ असं परखड मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’