हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात जलयुक्त शिवार योजनेवरून व विदर्भ, मराठवाडा येथील अतिवृष्टीच्या नुकसानीवरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर आघाडी सरकारकडून आरोप करण्यात आले होते. तसेच महापुराची कारणे शोधताना पर्यावरण अभ्यासकांनी फडणवीस यांनी राबविलेल्या महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारकडे बोट दाखवले होते. यावरून भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “लोक शहाणे आहेत, ठाकरे सरकारच्या अपप्रचाराला भुलणार नाहीत. जलयुक्त शिवारचे फायदे त्यांनी अनुभवलेत, असा टोला भातखळकर यांनी लगावला.
जलयुक्त शिवार योजनेवरून भाजपचे नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले जात असल्याने भाजप आमदार भातखळकर यांनी ट्विट करीत ठाकरे सरकारवर निशाणा साधला. “लोक शहाणे झाले आहेत, ठाकरे सरकारच्या अपप्रचाराला भुलणार नाहीत. जलयुक्त शिवारचे फायदे त्यांनी अनुभवलेत,” असे भातखळकर यांनी म्हंटले आहे.
लोक शहाणे आहेत, ठाकरे सरकारच्या अपप्रचाराला भुलणार नाहीत. जलयुक्त शिवारचे फायदे त्यांनी अनुभवलेत. https://t.co/B4pFVr51WI
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 5, 2021
पावसामुळे मराठवाडा, विदर्भासह राज्यातील अनेक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. महापुराची कारणे शोधताना पर्यावरण अभ्यासकांनी भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राबविलेल्या महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारकडे बोट दाखवले होते. याला भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करून प्रत्युत्तर दिले आहे. तसेच ठाकरे सरकारवरही निशाणा साधला आहे.