हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे केल्या जात असलेल्या आंदोलनावरून भाजपकडून टीका केली जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र बंदबाबत प्रतिक्रिया दिली. त्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करीत हल्लाबोल केला आहे. “जनाब संजय राऊत मुळात तुम्हाला शरद पवार काकाचं दु:ख सतावत आहे,” असे पडळकर यांनी म्हंटले आहे.
भाजप नेते तथा आमदार गोपीचंद पडळकर यांनी ट्विट करून महाराष्ट्र बण्डवर टीका केली आहे. यावेळी पडळकर यांनी म्हंटले आहे की, शिवसेना खासदार संजय राऊत मुळात तुम्हाला काकाचं दु:ख सतावत आहे. कारण पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राच्या सहकाराला लागलेली प्रस्थापितांची किड साफ करायला घेतली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे खाणारे, कारखाने कवडीमोल भावाने गिळणाऱ्यांवरती फास आवळत आहेत. त्याचेच पित्त झाल्यामुळे हा महाराष्ट्र बंदचा देखावा करण्यात आला आहे.
जनाब #SanjayRaut मुळात तुम्हाला काकाचं दु:ख सतावत आहे. कारण मा.पंतप्रधान मोदीजी महाराष्ट्राच्या सहकाराला लागलेली #प्रस्थापितांची किड साफ करतायेत.याचंच पित्त झाल्यामुळे हा #महाराष्ट्र बंदचा देखावा आहे.#BJPMaharashtra #ओला_दुष्काळ pic.twitter.com/B2JjCohKxT
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) October 11, 2021
आमचे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ क्षमतापूर्ण आहेत, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी ते नक्कीच कठोर निर्णयही घेतील. पण जनाब राऊत तुम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांबद्दल बोला. तो ओल्या दुष्काळामुळे आत्महत्येच्या उंबरठ्यावर आला आहे. शेतकऱ्याचा साताबारा कोरा करू म्हणणारे अजूनपर्यंत त्याला मदत द्यायला बांधावरती पोहचले नाहीत. अजूनही शेतकऱ्यांना पंचनाम्याच्या खाबूगिरीतच अडकवलेले आहे. तुमचा हा महाराष्ट्र बंदचा कांगावा म्हणजे आपल्या घरात आग लागलेली असताना शेजारच्या गावातील धुरावर बोंबा मारण्यासारखे असल्याचे पडळकर यांनी म्हंटले आहे.