हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनात आज विधानसभा सदस्य भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली. जाधव यांनी केलेल्या नक्कलीवरून भाजप आमदार नितेश राणे यांनी घणाघाती टीका केली आहे. भास्कर जाधव हा कुठला रोग आहे, हे कोकणातील लोकांना पहिल्या दिवसापासून माहिती आहे. तो सोंगाड्या आहे. काल तो राष्ट्रवादीचा आज तो शिवसेनेचा तर उद्या तो भाजपचापण सोंगाड्या होईल, अशा शब्दात राणेंनी टीका केली.
मुंबईत हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक व सत्ताधारी यांच्यात अनेक मुद्यांवरून खडाजंगी झाली. यावेळी भास्कर जाधव यांनी पंतप्रधान मोदी याची नक्कल केली. यावरून भाजप नेते नितेश राणे यांनी जाधव याच्यावर निशाणा साधला आहे. माध्यमांशी बोलताना राणे म्हणाले की, भास्कर जाधव हा कुठला रोग आहे, हे कोकणातील लोकांना पहिल्या दिवसापासून माहिती आहे. तो सोंगाड्या आहे.
नाटकामध्ये जसा नरकासूर जसा कुठलेही सोंग ठेवत नाही, वेगवेगळे सोंग बदलत असतो. तशी भास्कर जाधवांची अवस्था आहे. अशा सोंगाड्या लोकांना समाजात काय किंमत आहे? हे चिपळूण आणि कोकणात राहणाऱ्या लोकांना विचारावे. अशा सोगाड्यांची यांची कोकणामध्ये लायकी उरलेली नाही आहे. ज्या पंतप्रधानांचे जगामध्ये नाव आहे, जगामध्ये ज्यांची ओळख आहे, या सोंगाड्याला त्यांची काय किंमत कळणार? अशा सोंगाड्याना किती महत्व द्यायचे हे आपण ठरवले पाहिजे, असे राणे यांनी यावेळी म्हंटले.