Thursday, February 2, 2023

मी भाजपचा खासदार, माझ्या मागे ईडी लागणार नाही; भाजप खासदाराचे धक्कादायक विधान

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात ईडीचे नुसते नाव जरी काढले तरी बड्या उद्योजकांना घाम फुटतो. अनेक राजकीय नेते, सिनेस्टार ईडीपासून चार हात दूरच असतात. सध्या महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्यांमागे आदींचा ससेमिरा लागला आहे. अशा परिस्थिती भाजप खासदार संजयकाका पाटील यांनी एक महत्वाचे धक्कादायक विधान केल्याने एकच खळबळ उडाली आहे. मी भाजपचा खासदार आहे. माझ्या मागे ईडी लागणारच नाही, असे पाटील यांनी म्हंटले आहे.

भाजप खासदार संजयकाका पाटील यांनी विटा येथील एका कार्यक्रमास हजेरी लावली. यावेळी ते म्हणाले की, माझ्यामागे कधीही सक्तवसुली संचलनालयाचा (ईडी) ससेमिरा लागणार नाही. कारण मी भाजपचा खासदार आहे. आम्ही राजकीय माणसे नसताना कर्ज काढून दाखवतो. आमची कर्ज पहिली की ईडी म्हणेल ही माणसे आहेत का काय?

- Advertisement -

भाजप खासदार संजयकाका पाटील यांनी केलेल्या या वक्तव्यावरून आता महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. त्यांच्या या वक्तव्यावरून भाजपवर निशाणा साधण्याची आयटी संधीच आघाडीतील नेत्यांना आता मिळालेली आहे.