हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपाचे माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना एका महिलेकडून धमकी देण्यात आल्याची घटना घडली आहे. सबंधित महिलेचा धमकीचा व्हिडिओ सद्या सोशल मीडियाचा चांगलाच व्हायरल झाला आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर तुम्ही दि. 12 रोजी संगोल्याच्या दौऱ्यावर येत असल्याची माहिती मिळालेली आहे. तुम्ही शशिकांत देशमुख व श्रीकांत देशमुख यांना जर पाठीशी घातले, तुमच्यासोबत हे दोघे भाऊ दिसले तर लक्षात ठेवा की माझ्याशी गाठ आहे, अशी धमकी एका महिलेकडून देण्यात आलेली आहे.
सबंधित महिलेचा धमकीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या व्हिडीओमध्ये महिला म्हणते की, शशिकांत देशमुख व श्रीकांत देशमुख यांना सोलापूर जिल्ह्यातील व मतदार संघातील एकही कार्यकर्ता ओळखत देखील नाही. मग तुम्हाला यांचा एवढा पुळका का? श्रीकांत देशमुखच्या बायकोला तुम्हीच बदली करून संगोल्यातून पुण्याला करून घेतले ना. जवळ आहे ना फलटणपासून पुणे? रणजित निंबाळकर एक इशारा देतेय मला थोडाही वेळ लागणार नाही तुमच्या पत्निपर्यंत पोहचायला?
मला अशा गोष्टी लोकांमध्ये बोलायला लावू नका? मी नरेंद्र मोदीं पर्यंत पण पोहचायला थांबणार नाही. कळल काय? माझा विषय सीआयडीकडे गेलेला आहे. कृपा करून आतापर्यंत ढवळा ढवळ खूप केली. यापुढे करू नका. जे सत्य आहे ते जनतेपर्यंत येऊ द्या. समजले ना. तुमचे ते दोघे भाऊ शशिकांत आणि श्रीकांत देशमुख जर तुमच्या कार्यक्रमात तेथे दिसली. तर स्टेजवर येऊन धिंगाणा करेन.
रणजितसिंह निंबाळकर एक गोष्ट लक्षात ठेवा नाहीतर तर गाठ माझ्याशी आहे…; महिलेकडून धमकी pic.twitter.com/nIWy1h2yTq
— santosh gurav (@santosh29590931) April 11, 2023
माझ्या नादाला लागायच नाही काय रणजित निंबाळकर. खूप झालं मी माझ्या सुवासिनीच्या लेण्यासाठी लढत आहे. मला तुम्ही लोकांमध्ये लफडेबाजी काढायची गरज नाही. पण जर तुम्ही परत या दोघा भावांना सोबत घेतल तर मग मी तुम्हाला सोडणार नाही. लक्षात ठेवा आणि माझ्या नादाला लागून नका. आणि आता मी करूनच दाखवणार आहे मी स्वतः कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन उपस्थित राहणार आहे. दोघे भाऊ जर कार्यक्रमात स्टेजवर दिसली तर तुम्हाला सोडणार नाही मी, असा इशारा सबंधित महिलेने दिला आहे.