व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्रवादी नवरा, शिवसेना बायको तर काँग्रेस जेवणापूरती वऱ्हाडी; भाजप खासदाराची जोरदार टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप खासदार सुजय विखे यांनी आज पुन्हा एकदा राज्यातील महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. या सरकार मध्ये राष्ट्रवादी नवऱ्याच्या भूमिकेत असून शिवसेना बायको आहे तर काँग्रेस हे जेवणापूरती वऱ्हाडी आहेत अशी टीका सुजय विखे पाटील यांनी केली आहे. कोणताही विचार जुळत नसताना केवळ सत्तेसाठी हे तिघे एकत्र आले आहेत असे ते म्हणाले. ते नगरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

सुजय विखे यांनी म्हंटल की, महाविकास आघाडीचा संसार असा आहे, लग्न हे राष्ट्रवादी शिवसेनेचं आहे , राष्ट्रवादी हे नवऱ्याच्या भूमिकेत आहे, शिवसेना ही मूक बायकोच्या भूमिकेत आहे तर काँग्रेस हे बिनबुलाये वऱ्हाडी आहेत, त्यांना कितीही बोललं तरी हे जेवणाचा ताट सोडायला तयार नाहीत अशी टीका भाजप खासदार सुजय विखे यांनी केली आहे.

यावेळी सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर पण निशाणा साधला. केंद्र शासनाच्या निधीतून अहमदनगर जिल्ह्यात जे रस्त्याचे काम झाले. त्याचे श्रेय राष्ट्रवादीचे काही आमदार घेतात. त्यांनी जराशी नैतिकता बाळगायला हवी असं म्हणत नाव न घेता त्यांनी रोहित पवार त्यांच्यावर निशाणा साधला