हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एनसीबीने क्रूझवर केलेली छापेमारी हे कुभांड असल्याचा आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी बुधवारी खळबळ उडवून दिली. मलिकांनी केलेल्या या आरोपांचा एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ इन्कार केला तर दुसरीकडे भाजपनेही राष्ट्रवादीच्या या आरोपाचे खंडन केले.यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि नवाब मलिक यांच्यावर सडकून टीका केली आहे.
नवाब मलिक महाराष्ट्र राज्यात मंत्री आहे याची खंत वाटते. जो ड्रग्सला समर्थन करतोय आणि ज्या अधिकाऱ्यांनी ट्रॅप लावून एक रॅकेट उधवस्त केलं त्यांच्यावर संशय घेतोय. आता राष्ट्रवादीवाले बॉलीवूडची पण भांडी घासायला लागले. काही महिन्यापूर्वी मलिकचा जावई ड्रग्समध्ये पकडला गेला होता.असे ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.
नवाब मलिक महाराष्ट्र राज्यात मंत्री आहे याची खंत वाटते. जो ड्रग्सला समर्थन करतोय आणि ज्या अधिकाऱ्यांनी ट्रॅप लावून एक रॅकेट उधवस्त केलं त्यांच्यावर संशय घेतोय. आता राष्ट्रवादीवाले बॉलीवूडची पण भांडी घासायला लागले. काही महिन्यापूर्वी मलिकचा जावई ड्रग्समध्ये पकडला गेला होता.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 7, 2021
अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन तसेच अरबाझ मर्चंट यांना एनसीबीने ताब्यात घेतल्याचे जे व्हिडीओ व्हायरल झाले, त्यात भाजप पदाधिकारी असल्याचे उघड झाले आहे. भाजपच्या लोकांसोबत अशा प्रकारची कारवाई कशी केली, याचा खुलासा एनसीबीने करावा, अशी मागणी मलिक यांनी केली. मलिक यांनी एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आर्यन खानला अटक करणारी व्यक्ती किरण गोसावी असून अरबाझ मर्चंटला अटक करणारा मनीष भानुशाली आहे. भानुशाली हा भाजपचा उपाध्यक्ष आहे. असा आरोप नवाब मलिक यांनी केला.