हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना विषाणूचा उद्रेक मोठ्या प्रमाणात वाढला असून पुणे शहरात देखील कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाची वाढती संख्या पाहता पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल आढावा बैठक घेतली. या आढावा बैठकीनंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना मागच्यासारखा कडक लॉकडाऊन लावण्याचे संकेत दिले आहेत.
अजित पवारांच्या विधानावरून भाजप नेते निलेश राणे यांनी जोरदार टीका केली आहे. निलेश राणे यांनी ट्विट करत म्हंटल की अजित पवार काही लाज शिल्लक आहे की नाही तुमच्यात… धमकी द्यायची नाही लोकांना, आता लोकं ऐकायच्या मनःस्थितीत नाही, राज्य सरकारने वाट लावली महाराष्ट्राची. तुम्ही आरोग्य व्यवस्था अगोदर नीट करा मग लॉकडाऊनची धमकी द्या असं राणे म्हणाले
अजित पवार काही लाज शिल्लक आहे की नाही तुमच्यात… धमकी द्यायची नाही लोकांना, आता लोकं ऐकायच्या मनःस्थितीत नाही, राज्य सरकारने वाट लावली महाराष्ट्राची. तुम्ही आरोग्य व्यवस्था अगोदर नीट करा मग लॉकडाऊनची धमकी द्या. https://t.co/IyZPJ2iiiN
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) April 16, 2021
अजित पवार नक्की काय म्हणाले-
दुसऱ्या लाटेत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आम्ही कठोर निर्णय घेतला आहे. रुग्ण वाढल्यामुळे असे निर्णय घेण्याची वेळ आली. याला सर्वांनी व्यवस्थित प्रतिसाद दिला नाही. तर मागच्यासारखा कडक लॉकडाऊन लावावा लागेल. त्यामुळे तशी वेळ येऊ देऊ नये अशी आम्ही विनंती करतो’. असे अजित पवार म्हणाले आहेत.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page