फक्त लॉकडाऊन घ्या आणि घरी बसा ; राणेंची ठाकरे सरकारवर टीका

0
28
Nilesh rane and uddhav thakarey
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाचा विस्फोट झाला असून रुग्णसंख्या झपाट्याने वाढतच आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात 15 दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. 1 मेला संपणारा हा लॉकडाउन असाच पुढे सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत। यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी ठाकरे सरकार वर टीका केली आहे.

मदत नाही, नियोजन नाही, आरोग्य सेवा नाही फक्त लॉकडाऊन घ्या आणि घरी बसा. आम्ही फक्त केंद्र सरकारवर टीका करणार आणि महाराष्ट्रातील जनतेला मूर्ख बनवणार. आमच्याकडे एक रिकामटेकडा संज्या आहे रोज सकाळी न ब्रश करता TV वर येतो. बाकी मेलात तरी चालेल कारण तुम्ही मेलात तर तुमची जबाबदारी.’ असा घणाघात निलेश राणेंनी केला आहे.

दरम्यान राज्यात आरोग्य यंत्रणांवरील ताण जैसे थे आहे. सध्या केंद्राने मदतीसाठी पुढाकार घेतल्यानंतर राज्यातील ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर पुरवठ्यातील तुटवडा काहीसा कमी झाला असला तरी रुग्णालयांमध्ये अद्यापही बेड मिळत नाहीये.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here