शरद पवारांना भाजपकडून खरोखर राष्ट्रपती पदाची आॅफर आहे का?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | राज्यातील सत्तासमीकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी सत्तास्थापनेबाबत बैठकांवर बैठका घेत असताना भाजपने मास्टरस्ट्रोक ठोकला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भाजपकडून राष्ट्रपती पदाची आॅफर असल्याचं बोललं जात आहे. एनडीटीव्हीने पवारांना राष्ट्रपती पदाची आॅफर असल्याचं वृत्त दिले आहे.

शरद पवार आज दिल्ली येथे पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांची भेट घेणार आहेत. संसद भवनात होणार्‍या सदर बैठकीत ओल्या दुष्काळावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे. मात्र या भेटी मागे पवारांना राष्ट्रपती पदाची आॅफर असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तसेच राष्ट्रवादीने राज्यात भाजपला मदत केल्यास केंद्रात राष्ट्रवादीला काही मंत्रीपदे मिळणार असल्याची चर्चा आहे.

शरद पवारांवर राष्ट्रवादीच्याच दोन खासदारांचा दबाव?

महाराष्ट्र टाईम्सच्या वृत्तानुसार, राष्ट्रवादीने भाजपसोबत हातमिळवणी करावी यासाठी शरद पवारांवर राष्ट्रवादीच्याच दोन खासदारांचा दबाव आहे. शिवाय अजित पवारांचेही मन वळवण्याचे प्रयत्न या दोन खासदारांकडून सुरु आहेत. भाजपसोबत सत्तेत गेल्यास, केंद्रात तीन मंत्रिपदे, राज्यातील सत्तेत मोठा वाटा आणि जुलै 2022 मध्ये शरद पवारांना राष्ट्रपतीपद असा फॉर्म्युला भाजपने राष्ट्रवादीला ऑफर केल्याची माहिती, टाईम्सने सूत्रांच्या हवाल्याने प्रकाशित केली आहे.

दरम्यान, शरद पवार यांनी मात्र आपण भाजपसोबत जाणार नसल्याचे पत्रकार परिषदेत वारंवार सांगितले आहे. जनतेने आपल्याला विरोधी बाकांवर बसण्याचा कौल दिला असून आपण सत्तास्थापनेत वाटेकरी नाही असं पवारांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे यांनीदेखील राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार ही केवळ अफवा असल्याचं सांगितलं आहे.

Leave a Comment