हे तर पुणेकरांना डावलल्यासारखं, सुज्ञ पुणेकर हे लक्षात ठेवतील; भाजपचा राष्ट्रवादीला इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : पुण्याच्या प्रश्नांसंदर्भात एक महत्वाची बैठक मंत्रालयात होणार आहे. मात्र या बैठकिचे निमंत्रम पुण्याच्या महापौराना न मिळाल्याने भाजपकडून नाराजी व्यक्त होत आहे. मला निमंत्रण नसणे हे पुणेकरांनाच डावलल्यासारखं आहे असं मत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले आहे.

महापौर म्हणून मंत्रालयात पुण्याच्या प्रश्नांसंदर्भात होणाऱ्या बैठकीचं निमंत्रण आपल्याला नाही, हे व्यक्तिशः मलाच नाही, तर पुणेकरांना डावलल्यासारखं आहे. कोरोना संकटाशी सामना करताना शहराचं हित लक्षात घेऊन आणि राज्य सरकारची भरीव मदत महापालिकेला नसतानाही आपण कधीही राजकारण केलं नाही अशा आशयाचे ट्विट मोहोळ य‍ांनी केले आहे.

तसेच, उलट मी कोरोनाबाधित असल्याचा काळ वगळता जवळपास सर्वच बैठकांना उपस्थित राहून आणि समन्वय ठेऊन पुढे जात राहिलो. मात्र या महत्त्वाच्या बैठकीलाच आपल्याला जाणीवपूर्वक सहभागी करुन न घेणे, हे पुणेकर चांगलंच लक्षात ठेवतील. कारण पुणेकर सुज्ञ आणि स्वाभिमानी आहेत. गेल्या चार वर्षांत झालेली पुणे शहरात झालेली विकासाची कामे आणि सुरु असलेल्या मोठ्या प्रकल्पाची माहिती समस्त पुणेकरांना आहे असं मोहोळ यांनी म्हटले आहे. तसेच आपल्याला डावलून का होईना पण शहराच्या प्रश्नांसंदर्भात बैठक होतेय, असं म्हणत मोहोळ यांनी राज्य सरकारच्या भुमिकेचं स्वागत केलं आहे.