पंढरपुरात ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्का ! ‘हा’ उमेदवार राष्ट्रवादीत दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. राष्ट्रवादी आणि भाजपनेही ही निवडणूक प्रतिष्ठेची केलीय. राष्ट्रवादी काँग्रेसनं दिवंगत भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी दिलीय. तर भाजपकडून समाधान आवताडे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलंय. अशावेळी भाजप आणि राष्ट्रवादीच्या दिग्गजांकडून विजयासाठी जोरदार प्रयत्न होताना पाहायला मिळत आहेत. अशावेळी कल्याणराव काळे यांचा भाजपला रामराम ठोकला असून राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. अशावेळी भाजपला एक मोठा धक्का बसलाय. कारण कल्याणराव काळे भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरत आहेत. 8 एप्रिल म्हणजे गुरुवारी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं आता नक्की झालंय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कल्याणराव काळे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे.

कल्याणराव काळे यांनी एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याचीही चांगलीच चर्चा झाली होती. आपण यापुढे शरद पवार साहेब जे सांगतील त्या पद्धतीने काम करू, असे कल्याण काळे यांनी काही दिवसांपू्रर्वीच म्हटलं होतं. पवार साहेबांच्या मदतीमुळेच आज साखर कारखान्याचे धुरांडे पेटले. आमच्यापण काही चुका झाल्या, परंतु त्यांनी कधीच दुजाभाव केला नाही. शेतकऱ्यांची कारखानदारी नीट चालावी, अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे आज पंढरपुरातील विठ्ठल ,चंद्रभागा आणि भीमा हे कारखाने सुरू झाले आहेत. त्यामुळे आपण यापुढे शरद पवारांचा नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे कल्याणराव काळे यांनी सांगितले होते. कल्याणराव काळे यांनी 2014 मध्ये काँग्रेसकडून निवडणूक लढवून 65 हजार मते मिळवली होती. ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर कल्याणराव काळेंनी भाजपात प्रवेश केल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीला माढ्यासारख्या बालेकिल्ल्यातच खिंडार पडले होते.

Leave a Comment