Saturday, February 4, 2023

महाराष्ट्रातही मोफत कोरोना लस द्यावी ; राम शिंदे यांची मागणी

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतात करोनाची लस आता येत आहे. केरळ, मध्यप्रदेश, आसाम, तेलंगणा, तामिळनाडू आदी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की, आम्ही मोफत करोना लस देणार आहोत. महाराष्ट्रातील जनतेला देखील करोना लस मोफत मिळावी, अशी आमची मागणी आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तसं निर्णय जाहीर करावा,’ अशी मागणी भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केली.

आपले पालकमंत्री कोल्हापूरचे आहेत. त्यामुळे तेथे हत्तीचा प्रश्न आहे. हत्तीच्या प्रश्नापुढे बिबट्याचा प्रश्न सोडवणे अवघड नाही. परंतु तो सोडवण्यासाठी त्यांची मानसिकता नाही. योग्य तो आदेश वन विभागाला ते देत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्री-बेरात्री शेतीच्या कामासाठी शेतात जाताना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. हसन मुश्रीफ यांनी हत्ती पकडण्याचे, हत्ती पळून लावण्याचे त्यांचे कौशल्य हे बिबट्याच्या संदर्भात जिल्ह्यात लावले, तर जिल्ह्यातील शेतकरी सुखी व समाधानी होतील. शेतकरी भयभीत राहणार नाहीत, असेही प्रा.शिंदे म्हणाले.

- Advertisement -

विजेचा प्रश्नावरून शिंदे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागली. ते म्हणाले, ‘महाराष्ट्र तोच आहे. या महाराष्ट्रात २०१९ पूर्वी कधीही लाईट जात नव्हती, डीपी जळल्याच्या तक्रारी होत नव्हत्या, ऑइल संपत नव्हते आणि संपले तरी तात्काळ देत होतो. पण त्याच महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन नंतर शेतकरी मेटाकुटीस आला आहे. अडचणीत आला आहे, त्याला लाईट वेळेवर मिळत नाही, मिळाली तर पूर्ण दाबाने मिळत नाही. अशा पद्धतीने जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय विजयाच्या संदर्भात नैराश्‍याचे वातावरण आहे. त्यावर शिरजोड म्हणून वीज बिल भरावे यासाठी तगादा लावला जातोय,’ असा आरोपही त्यांनी केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’