हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण अतिशय तापलं असून राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
मराठा आरक्षणाची मागणी 1985 पासून केली जात आहे. तेव्हापासून आजवर झालेल्या मराठा मुख्यमंत्र्यांनी आरक्षण देण्याची धमक दाखवली नाही. तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले आणि 50 वर्षांची राजकीय कारकीर्द असलेले शरद पवारही मराठा समाजाला आरक्षण देऊ शकले नाहीत. ते आरक्षण देवेंद्र फडणवीस यांनी देण्याची हिम्मत दाखवली ते सुद्धा या सरकारला टिकवता आलं नसल्याचं संजय काकडे म्हणाले.
दरम्यान, शरद पवार यांची 50 वर्षांची राजकीय कारकीर्द आहे. तीन वेळा ते मुख्यमंत्री झाले. मराठा नेते म्हणून पश्चिम महाराष्ट्रातून ते उदयास आले. मराठ्यांसाठी काहीतरी करतील अशी समाजाला आशा होती. पण त्यांनाही आरक्षण देता आले नाही. कोकण, विदर्भ, मराठवाड्यात राष्ट्रवादी आहे कुठे असा सवालही काकडेंनी केला.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.