ओबीसी आरक्षणासाठी 26 जूनला भाजप करणार चक्काजाम आंदोलन; पंकजा मुंडे यांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा आरक्षणाच्या मुद्यानंतर आता भाजपने ओबीसी आरक्षणाचा मुद्दा हाती घेतला आहे. त्या दृष्टीने विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सागर येथील निवास्थानी शुक्रवारी ओबीसी समाजातील नेत्यांची महत्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीनंतर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी महत्वपूर्ण घोषणा केली. महाविकास आघाडी सरकारने ओबीसींच्या भविष्याचा खेळखन्डोबा केला आहे. त्यामुळे या महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात येत्या २६ जून रोजी भाजपकडून राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात येईल, अशी घोषणा यावेळी मुंडे यांनी केली.

ओबीसी वर्गाच्या आरक्षणाचा प्रश्न सध्या महत्वाचा बनला असून याबाबत भाजपकडून चक्काजाम आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. आज विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी ओबीसी समाजाच्या नेत्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत भाजपकडून करण्यात येणाऱ्या चक्काजाम आंदोलनाबाबत चर्चा करण्यात आली. या महत्वपूर्ण बैठकीला भाजपचे अनेक दिग्ग्ज नेतेही उपस्थित होते.

या बैठकीनंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी माध्यम प्रतिनिधींशी साधलेल्या संवादावेळी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. ओबीसी समाजाचे आरक्षण गेले त्यास महाविकास आघाडी सरकारच जबाबदार आहे. त्यामुळे या आघाडी सरकारच्या विरोधात या सरकारला धडा शिकविण्यासाठी आम्ही राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

You might also like