Breaking News : ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून भाजप कार्यकर्त्याची हत्या

औरंगाबाद प्रतिनिधी | ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून भाजप कार्यकर्त्याची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबाद जिल्ह्यातील जोडवाडी या गावात घडला आहे. या घटनेमुळे औरंगाबाद जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. हरिसिंग गुशिंगे असं हत्या झालेल्या भाजप कार्यकर्त्याच नाव आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील जोडवाडी गावात भाजप कार्यकर्त्याची हत्या झाल्याचे समोर आले आहे. ही हत्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून झाल्याचे बोलले जात आहे. हरिसिंग गुशिंगे असं हत्या झालेल्या भाजप कार्यकर्त्याच नाव असून शुक्रवारी रात्री 9 वाजता तिघांनी गुशिंगे यांची हत्या केल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, हल्लेखोरांना अटक करण्यासाठी ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले आहे. पोस्टमार्टेम करण्यालाही ग्रामस्थांनी विरोध केला आहे. आरोपींना अटक केल्याशिवाय अंत्यविधी न करण्याचा ग्रामस्थांनी पवित्रा घेतला आहे.

You might also like