Saturday, February 4, 2023

शिवसेनेनंतर राष्ट्रवादी फोडण्याचा भाजपचा डाव; पवारांचा सनसनाटी आरोप

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या ३ महिन्यापूर्वी शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व बंडाळीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबियांना फोडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे असा सनसनाटी आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केला. रोहित पवार यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

रोहित पवार म्हणाले, शिवसेनेनंतर आम्हाला लक्ष्य केलं जाऊ शकतं. आमच्या घराण्यात फूट पाडण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. पवार घराण्यात वर्चस्वाची लढाई झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसही फुटेल, असं विरोधकांना वाटतं. त्यामुळे शिवसेनेनंतर विरोधकांचं पुढचं लक्ष आम्ही असू शकतो, असं विधान रोहित पवार यांनी केलं.

- Advertisement -

दरम्यान, अजित पवार आणि तुमचे संबंध कसे आहेत? असं सवाल रोहित पवारांना केला अजित पवारांनीच मला जिल्हा परिषद आणि आमदारकीचं तिकीट दिलं. येव्हडच नव्हे तर माझं लग्नही अजितदादांनीच ठरवलं होतं असं रोहित पवार म्हणाले. आणि जेव्हा आपण मोठे होत असतो तेव्हा आपल्या लोकांसोबत स्पर्धा करायची नसते. आम्ही कौटुंबिक भांडणात वेळ वाया घालवत नाही असेही त्यांनी स्पष्ट केलं.