हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या साथीमुळे सगळ्या जगभर थिएटर बंद झालेली आहेत.ज्यामुळे अनेक चित्रपटांचे प्रदर्शन थांबले आहे.अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी यांचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट २२ मे रोजी रिलीज होणार होता.परंतु सध्या सुरु असंलेल्या या लॉकडाऊनमुळे हा चित्रपट रिलीझ होणार नाही आहे.मात्र या लक्ष्मी बॉम्बचे निर्माते हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याची शक्यता आहे.रिपोर्ट्सनुसार डिस्ने प्लस हॉटस्टारवर हा चित्रपट रिलीज होण्याची चर्चा सुरू आहे.
मिड-डेच्या अहवालानुसार, अक्षय कुमार स्टुडिओ लक्ष्मी बॉम्ब थेट डिजिटल प्लॅटफॉर्मवर सोडण्यासाठी चर्चेत आहे. लक्ष्मी बॉम्बच्या रिलीज़चे राइट्स विकत घेण्यासाठी डिस्ने + हॉटस्टारने अक्षयशी चर्चा केली आहे.
रिपोर्ट्सनुसार, अक्षय कुमार या ऑफरवर चित्रपट दिग्दर्शक राघव लॉरेन्सशी चर्चा करत आहे.या चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनमध्ये अद्यापही संपादन, पार्श्वभूमी संगीत, मिक्सिंग आणि व्हीएफएक्सचे काम बाकी आहे.चित्रपटाची टीम जर घरून काम करत असेल तर या सर्व गोष्टी करण्यास पूर्वीपेक्षा जास्त वेळ लागेल.मात्र,निर्माते जूनमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा विचार करीत आहेत. कारण लॉकडाउन ३ मे पर्यंत आहे आणि त्यानंतरही लोकांना सोशल डिस्टंसिंग पाळण्याच्या सूचनाही दिल्या जात आहेत.
लक्ष्मी बॉम्ब एक हॉरर-कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात अक्षय एका नपुंसकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या सिनेमात कियारा अक्षय बरोबर दिसणार आहे,हा भयपट एक तामिळ चित्रपट ‘मुनी २: कांचना’ चा हिंदी रीमेक आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.