अमिताभ बच्चन कोरोना वॉरिअर्सना म्हणाले,’मी नतमस्तक आहे’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतात, ते आपले अनेक जुने किस्से आणि फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतात.याद्वारे,ते लोकांना कोरोना विषाणूची जाणीव करुन देण्याची संधी सोडत नाहीयेत.यावेळी त्यांनी कोरोनाव्हायरस रूग्णांच्या काळजीवाहू आणि या संकटाचा सामना करणाऱ्यांचे आभार मानले आहेत.

बिग बींनी ‘नर्स’, ‘डॉक्टर’, ‘सफाई कामगार’ आणि ‘पोलिस’ अशा शब्दांनी काढलेले श्री गणेशाचे चित्र शेअर केले आहे.फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले, “फ्रंट-लाइन कामगार .. डॉक्टर आणि परिचारिका .. सामाजिक योद्धा .. मी नतमस्तक आहे.”

अलीकडेच बॉलिवूडमधील या दिग्गज अमिताभ यांनी बॉक्सिंग मधील दिग्गज ज्येष्ठ महंमद अलीला भेटण्यासंदर्भात एक ब्लॉग लिहिला होता,ज्यात त्यांनी सांगितले की चित्रपट निर्माते प्रकाश मेहरा यांना एका चित्रपटात दोन मोठ्या आयकॉन्सना एकत्र आणण्याची इच्छा होती.अमिताभ बच्चन यांना ब्लॉग लिहिण्यास १२ वर्षे पूर्ण झाली आहेत.त्यांचा एकही दिवस असा जात नाही जेव्हा ते ब्लॉग लिहित नाही असे त्यांनी सांगितले.अमिताभ बच्चन लवकरच ‘फेस’, ‘गुलाबो सीताबो’, ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘झुंड’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.