कोरोना विषाणूविरूद्धच्या लढाईत कपिल शर्मा-हृतिक रोशनने केली मदत,दिली लाखोंची देणगी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोनाव्हायरसशी लढा देण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन आहे आणि अत्यावश्यक सेवांशी जोडलेले लोक या संघर्षासाठी सातत्याने पूर्ण ताकदीने प्रयत्न करीत आहेत. या विषाणूमुळे देशाच्या आर्थिक स्थितीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे, तर रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांना दुहेरी मरणाचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत कॉमेडियन कपिल शर्माने देशाच्या कोरोनासाठी सुरू झालेल्या या युद्धामध्ये आपले हात पुढे केले आहेत. कपिल शर्माने कोरोनाबरोबर सुरू असलेल्या या युद्धामध्ये ५० लाख रुपयांची देणगी दिली आहे. त्याचवेळी अभिनेता हृतिक रोशननेही २० लाख रूपयांची देणगीदिली आहे.

कपिल शर्माने थोड्या दिवसांपूर्वीच ट्विटरवर लिहिले होते की, ‘अशी वेळ आली आहे की सर्वांनी एकत्र उभे राहण्याची गरज आहे. कोरोना विषाणूंविरूद्ध लढण्यासाठी मी पीएम रिलीफ फंडामध्ये ५०लाख रुपये देणगी देत ​​आहे. मी सर्वांना घरीच राहण्याची विनंती करतो. #stayhome #staysafe #jaihind #PPPMrelieffund ‘

 

कपिलच्या अगोदर दक्षिण सुपरस्टार पवन कल्याणनेही कोरोनाशी लढण्यासाठी २ कोटींची देणगी दिली आहे. पवन यांनी पीएम रिलीफ फंडात १ कोटी आणि आंध्र प्रदेश आणि तेलंगणा सीएम रिलीफ फंडमध्ये ५० लाखांची देणगी दिली आहे.

 

 

 

 

Leave a Comment