Saturday, March 25, 2023

चीन च्या चुकांवर पुस्तक; वुहान डायरी च्या लेखिकेला जीवे मारण्याची धमकी

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या ३ महिन्यांत चीनने केलेल्या चुकांची यादी बरीच वाढली आहे.वुहानच्या प्रयोगशाळेत किंवा वुहानमधील कोरोनाव्हायरस-संक्रमित लोकांच्या उपचारात चूक झाली का,याबाबत चीनच्या लेखिका फेंग फेंग यांनी आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून हा खुलासा केला आहे.हे एक असे पुस्तक आहे ज्यामुळे चीनची झोप उडाली आहे.

कोरोनाबाबत चीन निष्काळजीपणाने वागला हे वारंवार नाकारत आहे.पण या पुस्तकात वुहानमधील चीनच्या प्रत्येक चुकांचा उल्लेख केलेला आहे आणि चीनमध्ये सत्य बोलणाऱ्यांना एकच शिक्षा आहे हे जगाला ठाऊक आहे.त्यामुळे चीनमध्ये वुहान डायरी लिहिणार्‍या लेखकाला आता जिवे मारण्याची धमकी दिली जात आहे.

- Advertisement -

वुहान हे कोरोनासह संपूर्ण जगाला जखम देणारे एक शहर आहे. परंतु वुहान शहर नव्हे तर जगाच्या नाशासाठी चिनी सरकारच जबाबदार आहे. आता वुहान शहरात पसरलेल्या कोरोनाचे योग्य चित्रण एका पुस्तकाच्या माध्यमातून जगासमोर येणार आहे.ज्यामुळे चीन दबावात आला आहे.

लेखनाला सर्वोच्च सन्मान मिळाला
लेखनासाठी असलेला चीनच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित झालेल्या ६४ वर्षीय फॅंग ​​फेंगला आज जिवे मारण्याची धमकी दिली जात आहे.फेंग फेंगचा गुन्हा असा आहे की त्यांनी वुहानमधील कोरोना उद्रेकाची संपूर्ण कहाणी आणि चीनी सरकारच्या सर्व पापांची नोंद एका पुस्तकात केली आहे. वुहान डायरी नावाचे हे पुस्तक आता प्रकाशित होणार आहे. जे जगाला चीनच्या सर्व गुन्ह्यांविषयीची महती सांगेल.

वुहान डायरी चीनच्या पापांची माहिती देईल?
– चिनी लेखक फॅंग ​​फेंग यांनी वुहान डायरी लिहिली
– लॉकडाऊनच्या घटनांचा उल्लेख वुहान डायरीमध्ये
– पुस्तकाच्या परदेशात पोहोचल्याने चीनला राग आला
– फॅंग ​​फॅनला जिवे मारण्याची धमकी दिली जात आहे
– चीनच्या लोकांनी फेंगवर देशाला लाजिरवाणे केल्याचा आरोप केला

कोठून आरडाओरडा सुरू झाला
२३ जानेवारी ते ८ एप्रिल या काळात वुहानमध्ये कडक बंदोबस्त लागू करण्यात आला. दरम्यान, फॅंगने वुहान डायरी लिहायला सुरूवात केली. जोपर्यंत फॅंग ​​रोजच्या आणि हलका गोष्टींचा उल्लेख करीत असेपर्यंत सर्व काही ठीक होते.त्यानंतर त्यांनी सरकारी गैरकारभाराची माहिती सांगताच आरडाओरडा सुरू झाला.

फेंगने आपल्या पुस्तकात सांगितले
– वुहानच्या रूग्णालयात एकही जागा शिल्लक नाही
– रुग्णालयातून रुग्णांना काढून टाकण्यात आले
– रुग्णालयात मास्क आणि उपकरणांची कमतरता होती
– मनुष्यापासून मनुष्यामध्ये कोरोनाचा प्रसार दुर्लक्षित केला गेला

अमेरिकन प्रकाशक हार्पर कोलिन्स हे वुहान डायरीला पुस्तकाचे स्वरूप देत आहेत. वुहान डायरी जूनपर्यंत बाजारात उपलब्ध होईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.