BPCL चे खाजगीकरण होणार, निर्गुंतवणुकीची प्रक्रिया सुरू; कंपनीचे शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । केंद्र सरकारने भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (BPCL) च्या निर्गुंतवणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे. सोमवारी कंपनीच्या संचालक मंडळाने याबाबत माहिती दिली आहे. कंपनीने नुमालीगड रिफायनरी लिमिटेड (Numaligarh refinery- NRL) मधील 61.65 टक्के भागभांडवल 9875 कोटी रुपयांना विकण्यास मान्यता दिली आहे. या बातमीनंतर कंपनीचे शेअर्स स्टॉक मार्केटमध्ये एका वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहेत.

BSE चे शेअर्स 4.2 टक्क्यांच्या वाढीसह 474.50 रुपयांवर उघडले गेले. यानंतर, 482.40 रुपयांची 52 आठवड्यांची उच्च पातळी गाठली होती, परंतु नंतर समभागांची गती मंदावली. आज कंपनीचे शेअर 3.24 टक्क्यांनी वाढून 470 रुपये प्रति शेअर्स वर बंद झाले.

1 मार्च 2021 रोजी मंजूर
BPCL ला आपल्या भागभांडवलाच्या विक्रीतून 9,875.96 कोटी रुपये मिळतील. भारत पेट्रोलियमच्या संचालक मंडळानेही 1 मार्च 2021 रोजी झालेल्या बैठकीत या करारास मान्यता दिली.

सोमवारी बाजार बंद झाल्यानंतर कंपनीने एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, BPCL च्या खासगीकरणाखाली नुमालीगड रिफायनरीतील 49% हिस्सा तेल इंडिया लिमिटेड (IOL) आणि इंजीनियर्स इंडिया लिमिटेड (Engineers India Ltd) च्या कंसोर्टियम केला जाईल. तर, आसाम सरकारला 13.65 टक्के विक्री केली जाईल.

ट्विट करुन दिलेली माहिती
सरकारच्या गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव (दीपम) तुहिनकांत पांडे यांनी ट्वीटद्वारे नुमलीगड रिफायनरीमध्ये भारत पेट्रोलियमचा संपूर्ण हिस्सा विकल्याची माहिती दिली आहे.

ब्रेकरेड फर्म Emkay Global ने म्हटले आहे की, BPCL च्या खासगीकरणाच्या प्रक्रियेतील हे एक महत्त्वाचे पाऊल आहे आणि कंपनीच्या निर्गुंतवणुकीची प्रक्रिया आर्थिक वर्ष 21-22 च्या उत्तरार्धात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. Emkay Global ने BPCL शेअर्सना खरेदी रेटिंग दिले आहे. त्याचबरोबर मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसने आणखी एका ब्रोकरेज कंपनीनेही त्याला रेटिंग दिले आणि असे सांगितले की,”नुमालीगड रिफायनरी विक्रीमुळे कंपनी आपले कर्ज कमी करू शकेल.”

कंपनी किती डिविडेंड देऊ शकते?
कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर 16 रुपये अंतरिम डिविडेंड देण्याबरोबरच प्रति शेअर 38 रुपये वाढीव डिविडेंड देऊ शकते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment