Breaking | रामदास आठवले शरद पवारांच्या भेटीला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | भाजप शिवसेना यांच्यात मुख्यमंत्रीपदावरुन चांगलेच जुंपले असताना सत्तास्थापनेचा तिढा अद्याप कायम आहे. अशात भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला गेले आहे. आठवले आणि पवार यांच्या भेटीमुळे राजकिय वर्तुळात उलट सुलट चर्चांना उधान आले आहे.

रामदास आठावले शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास शरद पवार यांच्या सिल्वरवोक या निवासस्थानी दाखल झालेत. आठवले आणि पवार यांच्यात चर्चा सुरु असून आठवले कोणता प्रस्ताव घेऊन आलेत काय हे अजून अस्पष्ट आहे.

राज्यातील राजकिय वातावरण चांगलेच तापले असून सत्तास्थापनेसाठी भाजपकडून सर्वस्तरातून प्रयत्न सुरु आहेत. मुख्यमंत्र्यांचा कालावधी संपायला अवघे काही तास शिल्लक असून परिस्थिती अशीच राहिली तर राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे

Leave a Comment