Breaking |राष्ट्रवादीला महाधक्का ; छगन भुजबळ शिवसेनेच्या वाटेवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आला आहे. ते राष्ट्रवादीत नाराज आहेत. त्यामुळे ते शिवसेनेत जाण्यास इच्छुक आहेत असे बोलले जाते आहे. छगन भुजबळ शिवसेनेत गेल्यास त्यांच्या जाण्याने राष्ट्रवादीचे मोठे नुकसान होईल हे मात्र त्रिकाल बाधित सत्य आहे.

विजय शिवतारेंना हृदयविकाराचा झटका

छगन भुजबळ राष्ट्रवादी सोडणार असल्याची कुणकुण राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना आणि काँग्रेसच्या नेत्यांना लागताच त्यांनी मुंबई मध्ये तातडीची बैठक बोलावली आहे. त्या बैठकीला छगन भुजबळ यांना देखील बोलावण्यात आले आहे. या बैठकीत छगन भुजबळ यांच्या अडचणी आणि त्यांची भूमिका मांडण्याची शक्यता आहे. छगन भुजबळ त्यांच्या येवला मतदारसंघात विसापूर गावातून दौरा अर्ध्यावर टाकून मुंबईकडे रवाना झाले आहेत.

हॉटेलचे नाव होते रिलॅक्स आणि सुरु होते सेक्स रॅकेट ; मुंबईमधील घटना

दरम्यान छगन भुजबळ यांना शिवसेनेत घेण्यास स्थानिक शिवसैनिकांनाच टोकाचा विरोध आहे. मागे एकदा त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चा सुरु झाल्या होत्या तेव्हा त्यांच्या विरोधाचे फ्लेक्स संपूर्ण नाशिक जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीने लावून त्यांना शिवसेनेत येण्यापासून अटकाव केला होता. छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाचे वारे संपूर्ण महाराष्ट्रात गोगांवत असतानाच छगन भुजबळ यांनी मात्र त्यांच्या शिवसेना प्रवेशावर बोलण्यास नकार दिला आहे. त्यांच्या नकाराचा अर्थ काढण्यास राजकीय जाणकार देखील कमी पडू लागले आहेत. अशात छगन भुजबळ यांच्या राजकीय निर्णयाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

विधानसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group Link – http://bit.ly/2MX7ZOF

WhatsApp Nambar – 9890324729

Facebook Page – Hello Maharashtra http://bit.ly/2YCtGur

गोपीचंद पडळकर वंचितला ठोकणार रामराम ; या पक्षात करणार प्रवेश

सोलापूर जिल्ह्यातील या मतदारसंघातून लढवणार गोपीचंद पडळकर लढवणार विधानसभा

गणेश नाईकांचा भाजपला धक्का ; त्यांच्या ‘या’ कृतीने भाजप हैराण

राज ठाकरेंना नोटीस आलेले कोहिनूर मिल प्रकरण नेमके आहे तरी काय?

कोहिनूर प्रकरणी राज ठाकरेंना ईडीची नोटीस ; मनसे कार्यकर्ते आक्रमक

Leave a Comment