नवी दिल्ली | काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा जामीन न्यायालने नामंजूर करत फेटाळून लावाल आहे. न्यायालयाकडून त्यांना मिळालेला आजवरचा हा सर्वांत मोठा धक्का मानला जातो आहे. ईडी आणि सीबीआयने त्यांना जामीन दिला जाऊ नये म्हणून न्यायालयात बाजू मांडली. तर चिदंबरम यांना प्रसिद्ध वकील मानले जाते तरी देखील त्यांचे विधी कौशल्य त्यांना न्यायालयात वाचवू शकले नाही.
आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग या प्रकरणात चिदंबरम यांची चौकशी सुरु आहे. ईडी आणि सीबीआयने केलेल्या युक्तिवादानुसार चिदंबरम चौकशीला सहकार्य देत नाहीत. त्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्याची परवानगी द्यावी असे म्हणण्यात आले होते. त्यानुसार प्रकरणाचे गांभीर्य ओळखून न्यायालयाने चिदंबरम यांचा जमीन फेटाळून लावला आहे.
आयएनएक्स मीडियाला विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाकडून बेकायदेशीरपणे मंजुरी मिळवून देण्यासाठी ३०५ कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप चिदंबरम यांच्यावर आहे. हे प्रकरण २००७ मधील असून, त्यावेळी चिदंबरम हे केंद्रीय अर्थमंत्री होते. या प्रकरणात सीबीआय आणि ईडीने यापूर्वीच चिदंबरम यांचे पुत्र कार्ती यांना अटक केली होती. सध्या ते जामिनावर आहेत.