मुंबई प्रतिनिधी | भष्टाचाराच्या आरोपावरून एकनाथ खडसे यांना आपल्या मंत्री पदाचा राजीमाना द्यावा लागला होता. याची खंत खडसेंनी नेहमी बोलून दाखवली आहे. आज विधानसभेत देखील विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवारांची निवड झाल्यावर बोलण्यासाठी उभेराहिले असता एकनाथ खडसे यांनी आपली खदखद बोलून दाखवली आहे.
राधा कृष्ण विखे पाटील नशीबवान आहेत. त्यांना विरोधी पक्षातून येऊन इकडे मंत्रिपद मिळते असे म्हणून एकनाथ खडसे यांनी त्यांच्या मनात असणारी सल बाहेर काढली आहे. त्याच प्रमाणे विजय वडेट्टीवारांना राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामुळे विरोधी पक्षनेतेपद मिळाले आहे. हे पद त्यांना मिळणे केवळ योगायोग आहे असे एकनाथ खडसे म्हणाले आहेत.
गिरीश मागून आला आणि आता निर्णय प्रक्रियेत मोठे स्थान त्याला मिळाले आहे. आमच्या पक्षात नेमके काय चालू आहे हे मला माहित नाही. पण मुख्यमंत्र्यांना देखील वाटते कि मी विरोधी पक्षात जातो कि काय असे एकनाथ खडसे म्हणाले आहेत. भाजपला कायम घरचा आहेर देणारे एकनाथ खडसे आज देखील भाजप नेत्यांचे उट्टे काढायला विसरले नाहीत.