मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेतली आहे. या भेटी मागे नेमके काय कारण होते ते अद्याप समजले नाही. मात्र राष्ट्रवादीतून होणारे आऊटगोईंग या भेटीचे कारण असावे असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. राष्ट्रवादीच्या सोबत निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने देखील राज ठाकरे आणि जयंत पाटील यांच्यात बोलणे झाले असावे अशी शक्यता आहे.
राज ठाकरे ज्यावेळी जयंत पाटील यांना भेटायला गेले तेव्हा त्यांच्या निवासस्थळी राजू शेट्टी, शेकापचे जयंत पाटील आणि अजित पवार उपस्थितीत होते. या सर्वांमध्ये नेमकी काय बातचीत झाली याचा तपशील मात्र अद्याप उघड झाला नाही. परंतु राष्ट्रवादी छोट्या पक्षांना एकत्रित घेऊन निववडणूक लढण्याच्या तयारीला लागली आहे. याची चुणूक मात्र या बैठकीतून राजकीय जाणकारांना मिळाली आहे.
राज ठाकरे यांच्या सोबत बैठक पार पडल्यानंतर जयंत पाटील हे शरद पवार यांना भेटण्यासाठी त्यांच्या मुंबईच्या निवासस्थळी गेले. तेथे त्यांनी राज ठाकरे यांच्या सोबत झालेल्या बैठकीचा आणि इतर छोट्या पक्षाच्या मागणीचा तपशील शरद पवार यांना दिला असावा असा देखील अंदाज व्यक्त केला जातो आहे.
महत्वाच्या बातम्या
इंदापूरच्या जागेवरून पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादीत कलगीतूर ; जागा सोडण्यास शरद पवारांचा नकार
गणपतराव देशमुखांची विधानसभा निवडणुकीतून माघार ; या कारणामुळे निवडणूक लढणार नाहीत
कराड येथील जुना कृष्णापूल कोसळला
मुंबईनंतर राष्ट्रवादीला बसणार नव्या मुंबईमध्ये झटका ; पवारांचा निकटवर्तीय नेता भाजपच्या वाटेवर
येडियुरप्पांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव ; मंत्रीमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा
पाथरी विधानसभा ; आयात उमेदवारांना नो एंट्री ; भूमिपुत्रांची होणार चलती